बातम्या
लग्नाच्या काही तास आधीच अघटित! स्मृती मानधनाचा विवाह सोहळा पुढे ढकलला; वडिलांना हृदयविकाराचा झटका
By nisha patil - 11/23/2025 4:50:43 PM
Share This News:
लग्नाच्या काही तास आधीच अघटित! स्मृती मानधनाचा विवाह सोहळा पुढे ढकलला; वडिलांना हृदयविकाराचा झटका
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिचा आज सांगलीत होणारा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. हळद, संगीत नाईटसह सर्व कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडले. मात्र लग्नाच्या काही तास आधीच एक मोठा अघटित घडला असून यामुळे संपूर्ण मानधना कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना लग्नाच्या अगोदर सकाळी नाश्ता करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती बिघडताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
वडिलांची तब्येत लक्षात घेऊन स्मृतीने ताबडतोब निर्णय घेत लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. वडील बरे झाल्यानंतरच विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय तिने घेतला आहे. त्यामुळे सर्व पाहुण्यांना घरी परतण्यास सांगण्यात आले आहे.
स्मृतीची जवळची मंडळी सांगतात की, “स्मृतीचा वडिलांवर जीव आहे. ते पूर्णपणे ठणठणीत होईपर्यंत ती लग्न करणार नाही.”
दरम्यान, डॉक्टरांनीही योग्य उपचार सुरू असल्याचे आणि प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले आहे.
मानधना कुटुंबीय सध्या रुग्णालयात आहेत आणि कुटुंबाची प्रायव्हसी जपावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
लग्नाच्या काही तास आधीच अघटित! स्मृती मानधनाचा विवाह सोहळा पुढे ढकलला; वडिलांना हृदयविकाराचा झटका
|