बातम्या

कंदलगावातील घरफोडीचा २४ तासांत छडा! दोघांस अटक; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

House burglary in Kandalgaon solved within 24 hours


By nisha patil - 11/14/2026 3:04:17 PM
Share This News:



कंदलगावातील घरफोडीचा २४ तासांत छडा! दोघांस अटक; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

कंदलगाव येथील रिसॉर्टच्या बांधकामाजवळील पत्र्याचे शेड फोडून साहित्य चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंदलगाव येथे १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी पत्र्याच्या शेडचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दोन वेल्डिंग मशीन आणि एक ग्राइंडर मशीन चोरून नेले होते. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी टेंबलाई मंदिर परिसरात सापळा रचून आदित्य दिंडे आणि ऋत्विक जाधव या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मशीनसह गुन्ह्यात वापरलेली मोपेड आणि कटावणी असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून, पुढील तपासासाठी आदित्य दिंडे आणि ऋत्विक जाधव या दोघांनाही गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


कंदलगावातील घरफोडीचा २४ तासांत छडा! दोघांस अटक; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त!
Total Views: 17