विशेष बातम्या
अंबाईवाडा येथे घराला आग; आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिला मदतीचा हात
By nisha patil - 6/16/2025 4:47:20 PM
Share This News:
अंबाईवाडा येथे घराला आग; आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिला मदतीचा हात
शाहूवाडी तालुक्यातील अंबाईवाडा येथील निनू काळू गावडे व बाळू काळू गावडे या बंधूंच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील धान्य, कपडे यांचे मोठे नुकसान झाले. घटनावेळी कुटुंबातील सदस्य शेतीकामासाठी डोंगरात गेले होते.
घटनास्थळी आमदार डॉ. विनय कोरे यांनी भेट देत धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच शासनाच्या माध्यमातून लवकरच घरकुल मंजूर करून देण्याची घोषणा केली.
यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती सर्जेराव पाटील, माजी सदस्य अमर खोत, सरपंच भाग्यश्री टोटपल यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
अंबाईवाडा येथे घराला आग; आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिला मदतीचा हात
|