विशेष बातम्या

आंबे गल्लीत घर कोसळले; आमदार राहुल आवाडे यांची तातडीने भेट

House collapsed in Ambe Gali

By nisha patil - 5/26/2025 4:39:39 PM
Share This News:

आंबे गल्लीत घर कोसळले; आमदार राहुल आवाडे यांची तातडीने भेट

पावसामुळे दुर्घटना, आमदारांच्या उपस्थितीत मदतकार्याला गती

 इचलकरंजी येथील आंबे गल्ली परिसरात जोरदार पावसामुळे भरत सुतार व अशोक सुतार यांचे घर पूर्णपणे कोसळले. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी प्रशासनाला मदतकार्य त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले.

त्यांच्यासोबत किशोर पाटील, बाळासाहेब कलागते, राहुल घाट, अविनाश परीट आदी मान्यवर उपस्थित होते.

आंबे गल्लीत घर कोसळले; आमदार राहुल आवाडे यांची तातडीने भेट
Total Views: 114