बातम्या
मल्हारपेठ गावात घराची भिंत कोसळली; तीन जखमी,
By nisha patil - 8/20/2025 11:36:48 AM
Share This News:
मल्हारपेठ गावात घराची भिंत कोसळली; तीन जखमी,
तहसीलदारांनी केली जखमींची विचारपूस
🖊 प्रतिनिधी : शहाबाज मुजावर, तारा न्यूज, पन्हाळा पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे सोमवारी रात्री उशिरा घराची भिंत कोसळून तिघेजण जखमी झाले. या अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
.%5B13%5D.jpg)
सागर धोंडिराम मोरे यांच्या राहत्या घराची भिंत शेजारील रंगराव दत्तू मोरे (वय 70) यांच्या घरावर कोसळली. या दुर्घटनेत समीक्षा नंदकुमार कापसे (वय 22), राधिका युवराज मोरे (वय 35) आणि रंगराव मोरे (वय 70) हे तिघेजण जखमी झाले आहेत.
.%5B7%5D.jpg)
यापैकी समीक्षा कापसे आणि राधिका मोरे यांच्यावर जाधव हॉस्पिटल, सावर्डे येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर गंभीर जखमी झालेल्या रंगराव मोरे यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
घटनास्थळी तात्काळ पंचनामा करण्यात आला असून रात्री उशिरा तहसीलदार सौ. माधवी शिंदे-जाधव यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.
.%5B8%5D.jpg)
दरम्यान, शेजारील घर राहण्यायोग्य अवस्थेत नसल्याने घरच्यांनी पर्यायी ठिकाणी वास्तव्य केले आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून गावामध्ये शांतता आहे.
मल्हारपेठ गावात घराची भिंत कोसळली; तीन जखमी,
|