ताज्या बातम्या
मेलिसा’ चक्रीवादळाचा जमैकावर कहर; सात जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत!
By nisha patil - 10/28/2025 12:37:48 PM
Share This News:
प्रिमियम कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅरिबियन देश जमैकावर ‘मेलिसा’ चक्रीवादळाचा कहर कोसळला आहे. सध्या या देशाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. २०२५ च्या वादळी सत्रातील हे आतापर्यंतचं सर्वात भीषण चक्रीवादळ ठरत असून, या वादळाने देशातील अनेक भागात मोठं नुकसान केलं आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
चक्रीवादळामुळे तीव्र वारे, मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. हेटी आणि डॉमिनिकन रिपब्लिक या भागातही या वादळाचा तडाखा बसला असून, हजारो घरांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यांवर झाडं उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमेरिकन हवामान विभागाने या वादळाला “विनाशकारी श्रेणी-५ चक्रीवादळ” घोषित करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
‘मेलिसा’ चक्रीवादळामुळे जमैकातील कॉफी उद्योगालाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मेलिसा’ चक्रीवादळाचा जमैकावर कहर; सात जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत!
|