विशेष बातम्या
पोटाची नस व छातीची हाडे तुटेपर्यंत पतीला बेदम मारहाण...
By nisha patil - 8/13/2025 2:59:54 PM
Share This News:
पोटाची नस व छातीची हाडे तुटेपर्यंत पतीला बेदम मारहाण...
तीन दिवस उपचाराशिवाय ठेवून पतीचा घेतला जीव
पत्नीने प्रियकरासोबत रचलेल्या कटाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजश्री अहिरे हिचे पती भरत लक्ष्मण अहिरे यांच्याशी बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. दरम्यान, तिचे चंद्रशेखर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते.
१५ जुलैच्या रात्री चंद्रशेखरने भरतला गोरेगाव पूर्वेतील ठिकाणी बोलावून दुसऱ्या आरोपीसह बेदम मारहाण केली. पोटाची नस व छातीची हाडे तुटेपर्यंत झालेल्या मारहाणीने भरत गंभीर जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात नेण्याऐवजी पत्नीने त्याला घरी आणून तीन दिवस उपचाराशिवाय ठेवले.
भरतची प्रकृती खालावत असतानाही त्याला मदत न करता पत्नीने मुलींना धमक्या दिल्या. “ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुम्हालाही मारून टाकीन,” असा इशारा ती सतत देत होती. शेवटी, उपचाराशिवाय भरतचा मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार भरतची १२ वर्षीय मुलगी श्रेयाने धाडसाने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोटाची नस व छातीची हाडे तुटेपर्यंत पतीला बेदम मारहाण...
|