बातम्या
कोट्यवधींची हायड्रोलिक क्रेन धुळखात! ऊस काटामारी रोखणारी यंत्रणा निष्क्रिय
By Administrator - 9/10/2025 3:47:58 PM
Share This News:
कोट्यवधींची हायड्रोलिक क्रेन धुळखात! ऊस काटामारी रोखणारी यंत्रणा निष्क्रिय
राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू होण्याआधीच ऊस काटामारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखरसम्राटांना इशारा दिला असतानाही, काटामारी रोखण्यासाठी असलेली यंत्रणा स्वतःच बंद पडलेली आहे. कोल्हापुरात 2014 मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेली हायड्रोलिक क्रेन आजही गोकुळ कार्यालया परिसरात धुळखात पडली आहे.
ड्रायव्हर आणि ऑपरेटर नसल्याचं कारण देत वैधमापन विभागानं या क्रेनचा वापरच केलेला नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान असूनही गेल्या अकरा वर्षांत एकदाही चाचणी घेतली गेली नाही. शेतकऱ्यांच्या काटामारी रोखण्यासाठी खरेदी केलेल्या 15 क्रेनपैकी बहुतांश आज निष्क्रिय आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोट्यवधींची हायड्रोलिक क्रेन धुळखात! ऊस काटामारी रोखणारी यंत्रणा निष्क्रिय
|