बातम्या
मीच त्याची पत्नी सहा महिलांनी केला दावा छत्तीसगडमध्ये हत्तीचा हल्लाभरपाईवरून सहा महिलांचा दावा
By nisha patil - 8/25/2025 12:21:50 PM
Share This News:
मीच त्याची पत्नी... सहा महिलांनी केला दावा
छत्तीसगडमध्ये हत्तीचा हल्ला; भरपाईवरून सहा महिलांचा दावा
छत्तीसगडच्या जशपूर जिह्यात हत्तीच्या हल्ल्यात एका गावकऱ्याचा मृत्यू झाला. सरकारने मृताच्या कुटुंबाला 6 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली, परंतु ही रक्कम मिळवण्यासाठी सहा महिलांनी त्या मृताची पत्नी असल्याचा दावा केल्याची खळबळजनक घटना घडली.
जशपूर जिह्यातील पत्थलगाव वन परिक्षेत्रातील बालाझार चिमटापाणी गावात 26 जुलै रोजी सालिक राम टोप्पो जंगलाकडे जात असताना एका हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात सालिकचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर सरकारने भरपाई रक्कम जाहीर केली. त्यानंतर सुगंधा, बुधियारो, संगीर्ता, शिला, अनिता आणि मीर्ना या सहा महिलांनी स्वतःला सालिक रामची पत्नी असल्याचे सांगून भरपाई मिळण्यासाठी दावा केला.
मीच त्याची पत्नी... सहा महिलांनी केला दावा छत्तीसगडमध्ये हत्तीचा हल्ला; भरपाईवरून सहा महिलांचा दावा
|