बातम्या
मी राजकारण करणारा मंत्री नाही: आ. प्रकाश आबिटकर
By nisha patil - 5/27/2025 4:24:06 PM
Share This News:
मी राजकारण करणारा मंत्री नाही: आ. प्रकाश आबिटकर
चुकीचे काम करणाऱ्यांची खैर नाही
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी प्रशासनातील कार्यपद्धतीवर ठाम भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक होईल, पण कामात हलगर्जी करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही.
शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असे त्यांनी बजावले. जिल्ह्यातील घरकुल योजनेंतर्गत ५० हजार कुटुंबांना निवारा देण्याचे नियोजन असून, दिव्यांग व इतर गरजूंच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, यावर त्यांनी भर दिला.
आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांबाबत सतर्क राहावे, औषध भांडारातील अनियमितता तातडीने दूर करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
भुदरगड व आजरा पंचायत समितीतील स्वच्छतागृहातील दुर्गंधीच्या तक्रारीवर त्यांनी संताप व्यक्त करत बांधकाम ठेकेदाराला जबाबदार धरले. "काम निकृष्ट असेल तर ठेकेदाराचा चौकात सत्कार करायला सांगावं लागेल," असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
"मी राजकारण करणारा मंत्री नाही, विकास कार्य करणारा कार्यकर्ता आहे," असे म्हणत त्यांनी विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा पुनरुच्चार केला.
मी राजकारण करणारा मंत्री नाही: आ. प्रकाश आबिटकर
|