ताज्या बातम्या
ज्ञानेश्वरी घरोघरी या संकल्पनेचा घेतलेला वसा यामुळेच मी आपल्यापुढे उभा-ह. भ.प. अशोक तर्डेकर
By nisha patil - 12/31/2025 11:31:16 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- सदगुरु भर्तरीनाथ महाराज यांची दहावी पुण्यतिथी ऊत्साहात संपन्न करीत खेडे ता. आजरा येथील ओम ब्रम्ह चैतन्य सिध्द सदगुरु भर्तरीनाथ महाराज याच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्ताने वारकरी पंरपंराने दिप प्रज्वलन विना पुजन अभिषेक हरिपाठ पालखी मिरवणूक व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय आजराच्या वतीने व हभप अशोक तर्डेकर यांच्या संकल्पनेतून हरिपाठ छोट्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या वेळी अशोक तर्डेकर यांनी वारकरी संप्रदाय हा मानवी कल्याण आणी आध्यात्मिक समाधानातून प्रगती कडे जाणारी वाटचाल असून नवीन वर्षीच्या स्वागतासाठी हरिपाठ छोटी पुस्तीका घराघरात वाटून वारकरी संप्रदायाची पताका नव्याने समाजात रुजवण्याची गरज असेलचे सांगितले.त्याचप्रमाणे पुढे ते म्हणाले की, आज माझं गाव ज्ञानेश्वरीच्या बाबतीत परिपूर्ण आहे.
तरुण पुढे येऊन ज्ञानेश्वरी मुखोदगर करण्यात पुढाकार घेत आहेत.आणि ज्ञानेश्वरी घरोघरी या संकल्पनेतून घेतलेला वसा यामुळे मी आज आपल्या समोर उभा आहे. याचा मला अभिमान आहे. कुणालाही काही याबाबत अडचण असेल तर आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. उमेश आपटे यांनी आषाढी निमित्ताने पंढरपूरात तीन दिवस राहिल्याने संताचा सहवास लाभला हा प्रमेश्वारीचा संकेत समजून भागवत धर्माच्या सोबत जाणे आवश्यक असलेचे सांगितले. यावेळी एस. के. पाटील, राजाराम जाधव यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी खेडे मठाचे रमेश चौगुले, श्रीरंग सातूसे, रवी भाटले,राजू होलम, गोविंद पाटील,शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, यूवराज पोवार,रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय मंडळ तालुका अध्यक्ष गौरोजी सुतार, संतू कांबळे, पांडुरंग जोशिलकर, दिपाली गुरव, कल्पना जाधव,शांताबाई चौगुले, शिवाजी गावडे, पांडूरंग पाटील,बाबू धुरे, सुर्यकांत गुरव, सचिन तपकिरे, पांडूरंग होलम यांच्यासह तालुक्यातील वारकरी भक्तगण ऊपस्थित होते.सुत्रसंचालनासह आभार कॉ.संजय घाटगे यानी मानले.
ज्ञानेश्वरी घरोघरी या संकल्पनेचा घेतलेला वसा यामुळेच मी आपल्यापुढे उभा-ह. भ.प. अशोक तर्डेकर
|