बातम्या
शहीद अब्दुलहमीद सेवा संस्थेची 23वी वार्षिक साधारण सभा संपन्न
By nisha patil - 1/10/2025 11:09:21 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- आजरा सावरवाडी येथील शहीद अब्दुल हमीद वि. का. स.सेवा संस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेचे संचालक युसूफ भडगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर ताळेबंद, नफातोटा पत्रक तसेच इतिवृत्तांतचे वाचन संस्थेचे सचिव रजनीकांत कुंभार यांनी केले.
या सभेमध्ये विविध विषयावर सांगोपांग चर्चा झाली. प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन अबूताहेर तकीलदार म्हणाले की, संस्था काही प्रमाणात तोट्यात आहे. परंतु संस्थेची 100%वसुली करून संस्थेने एक नवीन आदर्श घालून दिला आहे. दरवर्षी 100%वसुलीमुळे संस्थेला आदर्श संस्था म्हणून मानले जाते. संस्थेचा तोटा कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील असून यासाठी पदरमोड करून संस्था चालवीत आहे. काटकसरीने संस्था चालवून पुढील काळात संस्था नफ्यात आणण्यासाठी प्रामाणिक व विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
युसूफ भडगावकर यांनी संस्थेचे भागभांडवल वाढण्यासाठी 10% शेअर्स रक्कम वर्गणी कपात करून घेणेबाबत मत मांडीत संस्थेसाठी निःस्वार्थपणे योगदान देत आलेल्या झाकीरभाई आगलावे यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्याबाबत मत मांडले. शेवटी बशीरभाई तकीलदार यांनी आभार मानले.
यावेळी इब्राहिम नसरदी (उपाध्यक्ष), बशीर (न्हन्या)लतीफ, बाबुभाई लतीफ, नियाज तकीलदार, कुदरत लतीफ, युसूफ खेडेकर, प्रकाश कांबळे, ताई शिंगटे, श्रीमती रजिया तकीलदार, आशपाक तकीलदार, शौकत लतीफ, इम्तियाज दिडबाग, बशीर काकतिकर, खलील दरवाजकर, सौ. शबाना (मुन्नी )तकीलदार, साबीर तकीलदार,साजिद दरवाजकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.
शहीद अब्दुलहमीद सेवा संस्थेची 23वी वार्षिक साधारण सभा संपन्न
|