बातम्या
करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई मंदिर व दख्खनचा राजा श्री. जोतिबा मंदिर हे दोन्ही तीर्थक्षेत्र आराखडे मंजूर झाल्याचा आनंद मोठा.....!
By nisha patil - 7/5/2025 4:14:46 PM
Share This News:
करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई मंदिर व दख्खनचा राजा श्री. जोतिबा मंदिर हे दोन्ही तीर्थक्षेत्र आराखडे मंजूर झाल्याचा आनंद मोठा.....!
करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीचा रू. १,४४६ कोटींचा आणि दख्खनचा राजा श्री. जोतिबा देवाचा रू. २६० कोटींचा हे दोन्ही तीर्थक्षेत्र आराखडे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्याचा मला फार मोठा आनंद झालेला आहे. या दोन्हीही तीर्थक्षेत्रांचे आराखडे हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या भक्ती आणि अस्मितेची प्रतीके आहेत. सबंध जिल्ह्याचे या दोन्हीही प्रकल्पांकडे लक्ष लागून राहिलेले होते. मी पालकमंत्री असताना या दोन्हीही तीर्थक्षेत्रांच्या आराखड्यांची आम्ही सुरुवात केली होती. नंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री सौ. माधुरीताई मिसाळ यांनी त्यामध्ये काही भर घातली.
श्री. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये देवालयासह देवालयाच्या परिसरातील कामे आणि पुनर्वसनाचा समावेश आहे. तसेच; श्री जोतिबा तीर्थक्षेत्राचा आराखडा ही तितकाच महत्त्वाचा आहे. या दोन्हीही तीर्थक्षेत्रांचे आराखडे राज्यातील सर्वात उत्कृष्ट आराखडे ठरतील. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तगणांना आराखड्यातील सुधारित दर्शन बारीमुळे विनासायास दर्शन होईल. तसेच; भाविक- भक्तांची चांगली सोय होणार असून पार्किंगचीही चांगली व्यवस्था होणार आहे.
करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई मंदिर व दख्खनचा राजा श्री. जोतिबा मंदिर हे दोन्ही तीर्थक्षेत्र आराखडे मंजूर झाल्याचा आनंद मोठा.....!
|