बातम्या
हर्षलला न्याय मिळवून देईन" – सतेज पाटील
By nisha patil - 7/26/2025 2:49:36 PM
Share This News:
हर्षलला न्याय मिळवून देईन" – सतेज पाटील
हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी आमदार सतेज पाटील यांची भेट...
सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी कामाचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी हर्षल पाटील यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करत "हर्षलला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नांची शर्थ करणार" असे स्पष्ट आश्वासन दिले.
हर्षलला न्याय मिळवून देईन" – सतेज पाटील
|