राजकीय
यड्राव मतदारसंघासाठी निधी कमी पडू देणार नाही
By nisha patil - 2/2/2026 11:00:21 AM
Share This News:
यड्राव मतदारसंघासाठी निधी कमी पडू देणार नाही
नामदार चंद्रकांतदादा पाटील
शिरढोण प्रतिनिधी(संजय गायकवाड) :- केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असल्याने यड्राव मतदारसंघात निधीची कमतरता भासणार नाही. मात्र त्यासाठी भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करा. यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपासाठी प्रतिष्ठेचा असल्याने या मतदारसंघातील भाजपाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
शिरढोण( ता शिरोळ) येथे भाजपाचे यड्राव जिल्हा परिषद उमेदवार सौ.संजना सातगोंडा पुजारी व शिरढोण पंचायत समिती उमेदवार तेजस्विनी गितन यादव यांच्या प्रचारार्थ येथील चावडी चौकात आयोजित सभेत मंत्री पाटील बोलत होते.
मंत्री पाटील पुढे म्हणाले केंद्र व राज्य सरकारने महीला, शेतकरी यांच्यासाठी विविध योजना राबवत आहे. महीलांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी नव्या अर्थसंकल्पात मोदींनी महीलांना व्यवसायासाठी १ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देवून उद्योजक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपले मत मोदीना असे समजून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
स्वागत व प्रास्ताविक अविनाश पाटील यांनी केले.यावेळी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासणे, राजवर्धन नाईक निंबाळकर, पोपट पुजारी, अन्वर जमादार यांची भाषणे झाली. यावेळी गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे, पंचगंगा साखर कारखान्याचे माजी चेअरमन रजनीताई मगदूम, सावकार मादनाईक धोंडीराम नागणे,ग्रा.प.सदस्य तेजस्विनी पाटील,ललिता जाधव,शोभा कोळी,संजय भंडारे,राजू हनबर,आनंदा सासणे,शिवाजी गावडे, अशोक मगदूम आदी उपस्थित होते.
यड्राव मतदारसंघासाठी निधी कमी पडू देणार नाही
|