बातम्या
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात : कोण होणार कॅप्टन?
By nisha patil - 1/14/2025 6:28:19 PM
Share This News:
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात : कोण होणार कॅप्टन?
पाकिस्तानच्या भूमीवर बऱ्याच वर्षानी आयसीसी स्पर्धा आयोजित केली जात आहे. 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. ही स्पर्धा आठ वर्षांनंतर खेळली जात आहे. तर भारतीय संघाने आणि पाकिस्तान यांनी संघाची घोषणा केलेली नाही. ऑस्ट्रेलियाने 13 जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. पॅट कमिन्सला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.
पाकिस्तानच्या भूमीवर आयसीसी स्पर्धा अनेक वर्षानी आयोजित केली जाणार आहे. 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होईल. ही स्पर्धा आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर खेळली जात आहे. तर भारतीय संघाने आणि पाकिस्तान अजून तरी संघाची घोषणा केली नाही. त्याआधी ऑस्ट्रेलियाने 13 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला. पॅट कमिन्सला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.
2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस आणि आरोन हार्डी सारख्या अष्टपैलू खेळाडू आहेत. संघाची तुलना 2023च्या वर्ल्ड कपशी केली तर फक्त 3 बदल करण्यात आले आहेत. तर ऑस्ट्रेलियाला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला असेल, परंतु कर्णधाराबद्दलची अनिश्चितता अजूनही कायम आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन संघ प्रचंड टेन्शनमध्ये आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात : कोण होणार कॅप्टन?
|