ताज्या बातम्या

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कोल्हापूर येथे विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

Republic Day celebrated with various activities at Maharashtra Workers Welfare Board Kolhapur


By nisha patil - 1/26/2026 6:14:22 PM
Share This News:



महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कोल्हापूर येथे विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा 

कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ललित कला भवन राजारामपुरी, कोल्हापूर येथील कार्यालयात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला
यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर व यशोदा आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. आशा केसरकर या उभयतांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगीत व ध्वजास मानवंदना दिल्यानंतर, डेली योगा ग्रुपच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून, देशाप्रती कृतज्ञता जोपासली. त्याचबरोबर राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्यावतीने उपस्थित सर्वांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाची 2026 ची दिनदर्शिका भेट स्वरूपात देण्यात आली. 

   प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करून देशातील नागरिकांनी आपली कर्तव्ये व जबाबदारी ओळखून कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कारण प्रजासत्ताक दिन आपल्याला अधिकारांसोबतच नागरी कर्तव्याची जाणीव करून देतो, त्यामुळे सर्वांनी देशाप्रती भरीव योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी प्रा. वसंत पाटील तसेच इतर मान्यवरांनी विविध विषयांस अनुसरून मनोगते व्यक्त केली. प्रा. वसंत पाटील यांनी पर्यावरणपूरक संदेश देताना मान्यवरांना रोप व पुस्तके भेट स्वरूपात दिली.
         उपस्थित सर्वच मान्यवरांचे केंद्र संचालक सचिन खराडे यांनी मंडळाचा श्रम कल्याण युग अंक व पेन देऊन स्वागत केले. तसेच मंडळाच्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती देवून प्रास्ताविक केले. तर अल्पोपहारानंतर सौ. स्वाती वायचळ यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
        यावेळी ॲड. योगेश केसरकर, गुणवंत कामगार संभाजी थोरात, शिवाजी चौगुले, रघुनाथ मुधाळे, संजय गुरव, बाळासाहेब कांबळे व मोहन घाडगे, सरदेसाई तसेच डेली योगा ग्रुपच्या सदस्या व भागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कोल्हापूर येथे विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा
Total Views: 87