ताज्या बातम्या
277 किमी सायकल रॅलीतून जवानांना सलामी..
By nisha patil - 1/29/2026 11:57:36 AM
Share This News:
277 किमी सायकल रॅलीतून जवानांना सलामी..
‘वंदे मातरम्’ रॅलीचा प्रेरणादायी उपक्रम
प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर–बेळगाव आर्मी सेंटर सायकल रॅली
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सायकल वेडे कोल्हापूर संस्थेच्या वतीने भारतीय जवानांच्या सन्मानार्थ ‘वंदे मातरम्’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राम मोहन कारंडे यांच्या संकल्पनेतून 109 मराठा लाईट इन्फेन्ट्री, कोल्हापूर ते 109 मराठा लाईट इन्फेन्ट्री, बेळगाव आर्मी सेंटर असा 277 किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करून जवानांना सलामी देण्यात आली.
देशाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या जिगरबाज भारतीय जवानांच्या साहस, कर्तव्य आणि सन्मानार्थ “एक राईड जवानों के नाम” या भावनेतून ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये राम कारंडे, पांडुरंग माळी, जयदीप पाटील, अंकुश पाटील, सचिन मुळे, चंद्रहास देसाई, निलेश बगली व दिनकर पोवार सहभागी झाले.
या उपक्रमासाठी गढमुडशिंगीचे माजी सरपंच तानाजी पाटील, फिट इंडिया प्रतिनिधी उमेश पोवार, नगरसेवक अश्किन आजरेकर व नरेंद्र मिठारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
277 किमी सायकल रॅलीतून जवानांना सलामी..
|