ताज्या बातम्या
आजऱ्यातील वीज वितरण कार्यालयात हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली
By nisha patil - 1/30/2026 1:10:54 PM
Share This News:
आजऱ्यातील वीज वितरण कार्यालयात हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली
आजरा(हसन तकीलदार):- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांची आठवण करून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात दोन मिनिटे मौन पाळून व स्तब्ध उभे राहून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.त्यानुसार आजरा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयासमोर सर्व विभागातील वीज कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो भारतात देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृत्यर्थ हा दिवस पाळला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयात देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यानुसार आजऱ्याच्या महावीतरण कार्यालयात सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दयानंद आष्टेकर (उपकार्यकारी अभियंता, आजरा)यांच्यासह आजरा उपविभागीय कार्यालयातील सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
आजऱ्यातील वीज वितरण कार्यालयात हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली
|