बातम्या
कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी IIT मंडीची तांत्रिक साथ
By nisha patil - 4/19/2025 5:02:23 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी IIT मंडीची तांत्रिक साथ
कोल्हापूर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तींच्या काळात अधिक प्रभावी व्यवस्थापन करता यावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि हिमाचल प्रदेशातील आयआयटी मंडी यांच्यात सामंजस्य करार झाला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याची माहिती दिली. या उपक्रमासाठी कोल्हापूरचे सुपुत्र आणि आयआयटी मंडीचे वित्त विभाग अधिष्ठाता डॉ. ससत्वशील रमेश पवार यांनी पुढाकार घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद सकपाळही उपस्थित होते.
जिल्ह्यात पूर, अतिवृष्टी, भूस्खलन, वनवे अशा आपत्ती वारंवार घडत असल्याने सज्जता महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मंडी संस्थेकडून तांत्रिक मदत, प्रगत तंत्रज्ञान व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. देशात नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यात आयआयटी मंडीचा आठवा क्रमांक आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी IIT मंडीची तांत्रिक साथ
|