शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयात IT करिअर गाइडन्स...
By nisha patil - 7/23/2025 9:00:38 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात IT करिअर गाइडन्स...
"‘IT Connect’ सेमिनारद्वारे बीसीए विद्यार्थ्यांना ग्लोबल करिअरचे दालन खुले"
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या बीसीए विभागात "IT Connect: Bridging B.C.A. with Global Opportunities" या विषयावर करिअर मार्गदर्शन सेमिनार पार पडला. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग या क्षेत्रातील नव्या संधींवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
प्रमुख मार्गदर्शक वक्ते रविराज मायदेव, मनीष भोसले, डॉ. राहुल मांडणीकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. बीसीए विभागप्रमुख प्रा. शेवडे व त्यांच्या टीमने संयोजन केले. संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे उपक्रमास मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शहाजी महाविद्यालयात IT करिअर गाइडन्स...
|