बातम्या

इचलकरंजी फेस्टिव्हल श्री २०२५ किताब धनराज कुंभारच्या नावावर

Ichalkaranji Festival Shri 2025 title in the name of Dhanraj Kumbhar


By nisha patil - 4/9/2025 5:43:51 PM
Share This News:



इचलकरंजी फेस्टिव्हल श्री २०२५ किताब धनराज कुंभारच्या नावावर

इचलकरंजी, दि. ४ : इचलकरंजी फेस्टिव्हलतर्फे आयोजित भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा घोरपडे नाट्यगृहात उत्साहात पार पडली. बलदंड शरीरयष्टी, पोझिंग आणि तरुणाईचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत धनराज कुंभारने ‘इचलकरंजी फेस्टिव्हल श्री २०२५’ किताब पटकावला.

  • सोहम साठे – बेस्ट पोझिंग

  • अनिरुध्द नाईक – मोस्ट मस्क्युलर अँड इम्प्रुव्हड

ही स्पर्धा ५५–६०, ६०–६५, ६५–७० आणि ७० किलोवरील अशा चार गटांमध्ये झाली. त्यात अनिरुध्द नाईक, योगेश गोंदकर, विजय टोणे, चेतन वाझे, प्रथमेश शिंदे, युवराज आडके, कार्तिक पराळ आदी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

स्पर्धेचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे, संयोजिका सौ. मोश्मी आवाडे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत झाला. पंच म्हणून राजेश वडाम, कैलास शिपेकर, संदीप यादव, दिपक माने, सचिन कुलकर्णी, दिपक खाडे, रविंद्र चौगुले व ओम सातपुते यांनी काम पाहिले.

या स्पर्धेला शहरातील जिमधारक, खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी विद्या सिरस, भाजप नेते प्रकाश दत्तवाडे, माजी पदाधिकारी, पत्रकार, मान्यवर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते अजिंक्य रेडेकर उपस्थित होते.


इचलकरंजी फेस्टिव्हल श्री २०२५ किताब धनराज कुंभारच्या नावावर
Total Views: 157