बातम्या
इचलकरंजी मनपाच्या आयुक्तांचा ‘नवीन फंडा’ – अपॉइंटमेंटशिवाय कोणीही नाही भेटणार!
By nisha patil - 4/26/2025 2:47:47 PM
Share This News:
इचलकरंजी मनपाच्या आयुक्तांचा ‘नवीन फंडा’ – अपॉइंटमेंटशिवाय कोणीही नाही भेटणार!
आयुक्तांनी निर्णयात बदल करावा – पत्रकार संघटनांची मागणी
शहरातील विविध प्रश्नांसाठी महानगरपालिकेत नागरिक आणि पत्रकारांची सतत वर्दळ असते. मात्र, सध्याचे मनपा आयुक्त यांनी नवाच ‘फंडा’ लागू केला आहे – अपॉइंटमेंटशिवाय कोणालाही भेट नाही. एका स्थानिक वृत्तपत्राचे संपादक नेहमीप्रमाणे वृत्तसंकलनासाठी आयुक्तांच्या भेटीस गेले असता त्यांनाही स्पष्टपणे सांगण्यात आलं की, अपॉइंटमेंट घेतली नसेल तर भेट शक्य नाही. त्यामुळे संपादकांनाही ‘बतावणी’ ऐकावी लागली. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांसह पत्रकारांमध्येही नाराजीचा सूर आहे. प्रशासनाशी संवाद ठेवणं आणि माहिती मिळवणं पत्रकारांचं काम असताना अशा अडथळ्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शहरातील जनतेने आणि पत्रकार संघटनांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आयुक्तांनी निर्णयात बदल करावा, अशी मागणी केलीय.
इचलकरंजी मनपाच्या आयुक्तांचा ‘नवीन फंडा’ – अपॉइंटमेंटशिवाय कोणीही नाही भेटणार!
|