बातम्या
आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून इचलकरंजीत बोरचे उद्घाटन
By nisha patil - 1/9/2025 3:59:31 PM
Share This News:
आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून इचलकरंजीत बोरचे उद्घाटन
नागरिकांच्या पाणीपुरवठा समस्येवर दिलासा; उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजीच्या जवाहर नगर, भोने माळ येथे आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून बोरचे उद्घाटन करण्यात आले. माजी शिक्षण सभापती राजू बोंद्रे यांच्या मागणीनुसार उभारण्यात आलेल्या या बोरमुळे परिसरातील नागरिकांना पाण्याची सोय होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी आमदार आवाडे म्हणाले की, “नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असून, भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.”या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहिले.
आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून इचलकरंजीत बोरचे उद्घाटन
|