बातम्या

इचलकरंजीत मनपा आयुक्तांचा 'नवा आदेश' - 

Ichalkaranjit Municipal Commissioner


By nisha patil - 4/26/2025 2:49:07 PM
Share This News:



इचलकरंजीत मनपा आयुक्तांचा 'नवा आदेश' - 

अपॉइंटमेंटशिवाय प्रवेशबंदी! पत्रकार संघटनांचा तीव्र निषेध

इचलकरंजी शहरातील विविध प्रश्नांसाठी महापालिकेत नागरिक आणि पत्रकारांची ये-जा नेहमीची असते. मात्र, सध्याच्या आयुक्तांनी एक नवा नियम लागू केला आहे - अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणालाही भेटीची परवानगी नाही.

एका स्थानिक दैनिकाचे संपादक नेहमीप्रमाणे बातमीसाठी आयुक्तांच्या भेटीस गेले असता, त्यांनाही अपॉइंटमेंट नसेल तर भेट शक्य नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले. परिणामी संपादकांनाही प्रशासनाच्या 'तपासणी'ला सामोरे जावे लागले.

या निर्णयामुळे नागरिकांमध्येच नव्हे, तर पत्रकार संघटनांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पत्रकारांसाठी प्रशासनाशी थेट संवाद साधणे आणि माहिती गोळा करणे अत्यावश्यक असते. मात्र, आयुक्तांच्या या नव्या धोरणामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत शहरातील विविध पत्रकार संघटनांनी आयुक्तांनी तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.


इचलकरंजीत मनपा आयुक्तांचा 'नवा आदेश' - 
Total Views: 120