विशेष बातम्या
इचलकरंजीत स्वप्निल आवाडे यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा
By nisha patil - 6/14/2025 3:10:48 PM
Share This News:
इचलकरंजीत स्वप्निलदादा आवाडे यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा
इचलकरंजी : इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर कमिटी यांच्या वतीने कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांचा ५० वा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, उत्तमआण्णा आवाडे, तसेच आमदार डॉ. राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. हजारो कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या साक्षीने वाढदिवसाचा सोहळा विशेष भव्यतेने पार पडला.
या वेळी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू उर्फ बाबासो पाटील, प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, प्रशांत कांबळे, किशोर पाटील, शेखर शहा, तानाजी भोसले, राजेंद्र बचाटे, राहुल घाट, बाबू रुग्गे, शांताप्पा मगदूम, तसेच शेतकरी बंधू, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात स्वप्निल आवाडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यामुळे इचलकरंजीत एकप्रकारे सामाजिक ऐक्य आणि सहकार क्षेत्रातील एकजूट अनुभवायला मिळाली.
इचलकरंजीत स्वप्निल आवाडे यांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा
|