बातम्या
इचलकरंजीत“एक पेड़ मां के नाम” उपक्रम उत्साहात पार पडला
By Administrator - 9/18/2025 2:53:50 PM
Share This News:
इचलकरंजीत“एक पेड़ मां के नाम” उपक्रम उत्साहात पार पडला
प्रकाशआण्णा आवाडे : आईच्या नावाने लावलेले झाड पिढ्यांना जीवनदायी ठरेल
भारतीय जनता पार्टी इचलकरंजी पश्चिम मंडलाच्या वतीने “सेवा पंधरवाडा 2025” उपक्रमांतर्गत सामाजिक, जनजागृती व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून “एक पेड़ मां के नाम” हा अभिनव उपक्रम नाना-नानी पार्क, लिंबू चौक व्यायाम शाळेजवळ पार पडला.
या उपक्रमात माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. “आईच्या नावाने लावलेले झाड हे स्मृतीचिन्ह न राहता पुढील पिढ्यांना प्राणवायू व छाया देणारे ठरेल. प्रत्येकाने आपल्या मातेसमर्पित झाड लावले पाहिजे,” असे आवाडे यांनी सांगितले.
माजी आमदार सुरेश हाळवणकर, शशिकांत मोहिते, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, सपना भिसे, सीमा कमते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महिला आघाडी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. झाडांच्या संगोपनाची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्विकारल्याने पर्यावरण संवर्धनाला दीर्घकालीन हातभार लागणार आहे.
इचलकरंजीत“एक पेड़ मां के नाम” उपक्रम उत्साहात पार पडला
|