शैक्षणिक
रमजान मुजावर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
By nisha patil - 12/11/2025 1:00:32 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार) डॉ.झाकीर हुसेन ॲंग्लो उर्दू हायस्कूल आजरा येथील शिक्षक रमजान मुजावर यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.जयसिंगपूर येथील शानदार स्पोर्ट्स अँड एज्युकेशन असोसिएशनच्या वतीने देशातील उर्दू शिक्षकांना सन्मानित करण्यात आले आहे.
मोहम्मद शफी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व आम.राजेंद्र पाटील -यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.विविध राज्यातील कर्तव्यनिष्ठ व निष्ठावंत आदर्श उर्दू शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यासह आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, हरयाना, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, अंदमान निकोबार, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.1995 चे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक एम.जी. पटेल, पत्रकार इम्तियाज खलील, अख्तर पटेल आणि शकीला पटेल यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
रमजान मुजावर हे आजरा येथील डॉ.झाकीर हुसेन ॲंग्लो उर्दू हायस्कूलमध्ये गेली अनेक वर्षे उर्दु विषय शिकवतात याशिवाय ते शेर शायरी मध्ये पारंगत आहेत.विविध कार्यक्रमात त्यांना निमंत्रित केले जाते. मकबूल असद या नावानेही त्यांना शायरी क्षेत्रात ओळखले जाते.त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांशी अगदी खेळीमेळीचे नाते ठेऊन शिकवण्यामध्ये त्यांची हातोटी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यामध्येही प्रिय शिक्षक आहेत.
रमजान मुजावर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
|