बातम्या

देवाभाऊंचे आडनाव फडणवीस नसते तर मी आमदार झालो नसतो – सदाभाऊ खोतांचे परखड विधान

If Devabhaus surname was not Fadnavis


By nisha patil - 9/13/2025 4:09:01 PM
Share This News:



देवाभाऊंचे आडनाव फडणवीस नसते तर मी आमदार झालो नसतो – सदाभाऊ खोतांचे परखड विधान

सांगली (प्रतिनिधी): “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव फडणवीस नसते तर मी आमदार झालो नसतो. त्यांचे आडनाव देशमुख किंवा पाटील असते तर कदाचित मला राजकारणात यश मिळाले नसते,” असे धडाकेबाज विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केले असून, त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सांगलीच्या कामेरी येथील सत्कार समारंभात खोत यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना स्पष्ट केले की, “मी राजकारणात अपघाताने आलो. राजकारणात पाय रोवण्यासाठी कोणाचातरी आधार आवश्यक असतो. तो आधार मला देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) यांच्या नावामुळे मिळाला.”

त्यांनी पुढे म्हटले, “राजकारणात वारसदाराची किंवा मार्गदर्शकाची गरज असते. कोणाचे तरी बोट धरून चालावे लागते. माझ्या आमदारकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या आडनावानेच मदत झाली.”

याच कार्यक्रमात आपल्या कार्यपद्धतीवर बोलताना खोत म्हणाले, “या व्यासपीठावरील सर्वांचा नांगर आम्ही बदलावा, कोणाचं रान नांगरायचं सदाभाऊंनी घेतलं असं अजिबात नाही.”

खोत यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली असून, विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.


देवाभाऊंचे आडनाव फडणवीस नसते तर मी आमदार झालो नसतो – सदाभाऊ खोतांचे परखड विधान
Total Views: 98