बातम्या
गोकुळ' कारभार पारदर्शक तर मग टोकन वाटप का? – महाडिक यांचा सवाल..
By nisha patil - 7/17/2025 3:15:46 PM
Share This News:
गोकुळ' कारभार पारदर्शक तर मग टोकन वाटप का? – महाडिक यांचा सवाल..
गोकुळ कारभारावर महाडिक यांचा सवाल; टोकन वाटपावर टीका
गोकुळ दूध संघाच्या कारभारावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी जोरदार टीका केली आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी संचालक पदासाठी 'टोकन' वाटप सुरू केल्याने त्यांच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं, असा आरोप त्यांनी केला.
महाडिक यांनी विचारले की, "दूध उत्पादकांचा काय फायदा संचालक संख्या २५ पर्यंत वाढवून? खर्च वाढवून मतांसाठी खिरापती वाटणे योग्य नाही."
त्याचबरोबर त्यांनी साडेचार कोटींच्या जाजम-घड्याळ खरेदीवर निविदेशिवाय खर्च झाला का? असा सवाल केला.
ते पुढे म्हणाले, "आमच्या काळात ३२ कोटींचा आयकर परतावा मिळाला, त्याचं काय झालं?"
तसेच, १४२ कोटींच्या ठेवी एका वर्षात ५१२ कोटींवर कशा गेल्या, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
बिनविरोध निवडणुकीसाठी मंत्री मुश्रीफ यांनी प्रक्रियेबाहेर राहून प्रयत्न करावेत, असा सल्लाही महाडिक यांनी दिला.
गोकुळ' कारभार पारदर्शक तर मग टोकन वाटप का? – महाडिक यांचा सवाल..
|