बातम्या
सतेज पाटलांना अंबाबाई मंदिर लांब वाटत असेल तर...
By nisha patil - 1/9/2025 5:49:05 PM
Share This News:
सतेज पाटलांना अंबाबाई मंदिर लांब वाटत असेल तर...
नेत्यावरील आरोप नगरसेवकांनी नको अंगावर घ्यायला” – प्रा. जयंत पाटील..
थेट पाईपलाईन योजनेवरूनवरून स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्यावर होत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नेत्यावरील आरोप नगरसेवकांनी अंगावर घेऊ नयेत, असे स्पष्ट आवाहन प्रा. जयंत पाटील यांनी केले आहे.
प्रा. पाटील म्हणाले की, “सचिन चव्हाण स्थायी समिती सभापती असताना या योजनेला मंजुरी मिळाली खरी, पण ती कोणतीही तांत्रिक व महत्वाची चर्चा न करता फक्त ३ मिनिटांत मंजूर करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर दोष नाही. प्रत्यक्षात हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून मिरवणाऱ्यांनीच या योजनेची जबाबदारी घ्यावी. ऐन सणासुदीच्या काळात जनतेला पाण्याविना ठेवणाऱ्या या अपयशाची जबाबदारी सतेज पाटलांनी घ्यावी आणि सार्वजनिकरीत्या माफी मागावी.”
ते पुढे म्हणाले की, “आम्ही आरोप केलेल्यांनाच चर्चेला यावे लागेल. अंबाबाई मंदिर लांब वाटत असेल, तर आम्ही बावड्याच्या हनुमान मंदिरात चर्चेला व शपथ घेण्यासाठी यायला तयार आहोत.”
सतेज पाटलांना अंबाबाई मंदिर लांब वाटत असेल तर...
|