बातम्या

लाच मागितली तर थेट १०६४ वर फोन करा! डीवायएसपी वैष्णवी पाटील यांचे आवाहन

If a bribe is demanded


By nisha patil - 10/27/2026 8:18:32 PM
Share This News:



लाच मागितली तर थेट १०६४ वर फोन करा! डीवायएसपी वैष्णवी पाटील यांचे आवाहन

 

लाचखोरीला घाबरू नका, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवा आणि लाचमुक्त, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर येथील पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले. बळीराजा करिअर अकॅडमी, गंगापूर येथे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सातबारा उताऱ्यावरील नोंदी, जात प्रमाणपत्र, अधिवास दाखला तसेच शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने तक्रार करावी. यासाठी १०६४ किंवा ९४०४३२१०६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. लाचखोरांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे वैष्णवी पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी अकॅडमीचे संस्थापक अजित जाधव यांनी आपल्या संस्थेतून सुमारे ९५० विद्यार्थी विविध शासकीय पदांवर नियुक्त झाल्याचा अभिमान व्यक्त केला. विद्यार्थिनींनी वैष्णवी पाटील यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाशदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर लाच देणे आणि लाच घेणे या दोन्ही गोष्टींपासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला संस्थापिका केतकी पाटील, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षकवृंद, ज्येष्ठ नागरिक मेजर साताप्पा ढेकळे, एसीबीचे विकास माने, उदय जाधव यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


लाच मागितली तर थेट १०६४ वर फोन करा! डीवायएसपी वैष्णवी पाटील यांचे आवाहन
Total Views: 12