राजकीय
निवडणुकीसाठी जर रक्त सांडत असेल, तर अशा निवडणुकांना अर्थ नाही
By nisha patil - 5/1/2026 12:49:18 PM
Share This News:
सोलापूर :-सोलापुरातील जोशी गल्ली येथील मनसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून झालेल्या राखून दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ४) अमित ठाकरे यांनी सोलापूर दौरा करत सरवदे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मनसे घेणार
या वेळी बोलताना अमित ठाकरे यांनी, बाळासाहेब सरवदे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना उचलणार असल्याचे जाहीर केले. “तुम्ही निवडणूक जिंका किंवा हरवा, पण राजकारण कोणत्या थराला जाऊन पोहोचले आहे, याचा तरी विचार करा,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
न्यायासाठी मुख्यमंत्री भेट अनिवार्य
“या प्रकरणी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांनी मला केवळ दहा मिनिटे द्यावीत. माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा जीव गेला आहे; मी शांत बसणार नाही. या घटनेला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.
सांत्वनावेळी भावनिक दृश्य
अमित ठाकरे सरवदे कुटुंबीयांच्या घरी पोहोचताच बाळासाहेब यांच्या पत्नी, आई व दोन्ही मुलींनी हंबरडा फोडला. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अमित ठाकरे यांनाही अश्रू अनावर झाले. जवळपास पंधरा मिनिटे घरातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.
निवडणुकीसाठी जर रक्त सांडत असेल, तर अशा निवडणुकांना अर्थ नाही
|