बातम्या
महापालिकेत संधी दिल्यास कोल्हापूरचा कायापालट करू – महाडिक यांची ग्वाही
By nisha patil - 6/30/2025 5:55:03 PM
Share This News:
महापालिकेत संधी दिल्यास कोल्हापूरचा कायापालट करू – महाडिक यांची ग्वाही
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असूनही नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, असा घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी केला. आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आणि १५ लाखांच्या निधीतून प्रभाग क्र. ८१ मधील जीवबा नाना जाधव पार्क येथील ख्रिश्चन समाजासाठीच्या सभागृहाचे भूमिपूजन रविवारी खासदार महाडिक यांच्या हस्ते पार पडले.
महाडिक म्हणाले, “मी स्वतः काळम्मावाडी थेट पाईपलाइन योजनेच्या पाण्यात अंघोळ केली, पण अजूनही कोल्हापूरला पाणी मिळत नाही हे दुर्दैव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरसाठी २७० कोटींचा निधी दिला आहे. रस्ते, वीज आणि उद्योग विकासाच्या वाटेवर आहेत. जनतेने महापालिकेत साथ दिल्यास शहर आणि उपनगरांचा कायापालट करू.”
या कार्यक्रमाला भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, प्रा. महादेव पोकळे, अॅड. दीपक गोते, दिलीप पाटील, गोपालकृष्ण काशीद यांच्यासह विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेत संधी दिल्यास कोल्हापूरचा कायापालट करू – महाडिक यांची ग्वाही
|