राजकीय

“तुम्ही पाठीशी नसता तर माझा राजकीय उदय झाला नसता” — मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार

If it weren t for your support

By nisha patil - 10/10/2025 5:20:44 PM
Share This News:

“तुम्ही पाठीशी नसता तर माझा राजकीय उदय झाला नसता” — मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार

कागल (दि.१०) : गोरगरीब जनतेमुळेच माझा राजकीय उदय झाला, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप कार्यक्रमात काढले.

या कार्यक्रमात २३५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप करण्यात आले. मुश्रीफ म्हणाले, “गोरगरिबांच्या वेदना जवळून पाहिल्या आहेत. त्यांच्या उपचारासाठी कायदे केले. त्यांच्या आशीर्वादावरच सहावेळा विजयी झालो.”

ते पुढे म्हणाले, “निराधार योजनेत वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करणे, पेन्शन २ हजार रुपयांपर्यंत वाढवणे व उत्पन्न मर्यादा ५० हजारापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.”

कार्यक्रमात प्रताप उर्फ भैया माने यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या समाजकार्याचा गौरव केला. दरवर्षीप्रमाणे या दिवाळी पाडव्यालाही “रुग्ण स्नेहमेळावा” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

“तुम्ही पाठीशी नसता तर माझा राजकीय उदय झाला नसता” — मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार
Total Views: 52