बातम्या

कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास गनिमी काव्याने उत्तर देऊ. 

If there is an attempt to count without any prior notice


By nisha patil - 11/20/2026 8:20:55 PM
Share This News:



कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास गनिमी काव्याने उत्तर देऊ. 
 

 शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. 

*आजरा(हसन तकीलदार):- शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याची प्रक्रिया राबवणाऱ्या महसूल यंत्रणेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना कोणतीही कल्पना न देता आज अचानक मोजणी पथक इसापूर येथे आले होते. शेतकऱ्यांना बेसावध ठेऊन अशी मोजणी करण्याचा शासनाचा हा प्रयत्न शेतकऱ्यांची फसवणूक करणारा आहे. आमचे महसूल विभागाला सांगणे आहे की त्यांनी सांगून मोजणीसाठी यावे आम्ही त्या पथकाला शेतकरी हिसका दाखवतील.  पोलीस बळाचा वापर करून आजरा तालुक्यातही शक्तीपीठची मोजणी करण्याचे नियोजन सरकारी पातळीवर सुरू असल्याचे समजते. शेतकऱ्यांना बेसावध ठवून मोजणीचा प्रयत्न केल्यास आम्ही तो हाणून पाडू असे शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीने म्हटले आहे.
       

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक मोर्चे आंदोलनातून आपला विरोध दाखवून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बेसावध ठेवून पोलीस बळाचा वापर करायचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो संघटितपणे शांतता मय मार्गाने हाणून पाडू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कॉ संपत देसाई, प्रा. सुनील शिंत्रे, युवराज पोवार, तानाजी देसाई, प्रकाश मोरुस्कर यांनी पत्रकातून दिला आहे.

*उद्या ज्या ठिकाणी इसापूर येथे शेतकऱ्यांना बेसावध ठेऊन मोजणी करण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कांही कार्यकर्ते भेट देणार आहेत. शेतकऱ्यांनी दबावाला अजिबात बळी पडू नये संघर्ष समिती आपल्यासोबत ठामपणे उभी राहील.असे संघर्ष समितीने आवाहन केले आहे.


कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास गनिमी काव्याने उत्तर देऊ. 
Total Views: 110