विशेष बातम्या
“तोंड उघडले तर बात दूर दूर तक जाईल…!” – मंत्री हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना तीव्र इशारा
By nisha patil - 11/21/2025 4:06:16 PM
Share This News:
“तोंड उघडले तर बात दूर दूर तक जाईल…!” – मंत्री हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना तीव्र इशारा
कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. “मी तोंड उघडले तर बात दूर दूर तक जायेगी… त्यांनी अजूनही तोंड आवरावे!” अशा थेट इशाऱ्याचं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्या दिशेने केलं आहे.
संजय मंडलिक यांनी केलेल्या उतावळ्या आणि बेजबाबदार टीकेला उत्तर देताना मुश्रीफ यांनी संयम राखत टीका परंतु स्पष्टपणे जाब विचारला.
मुश्रीफ म्हणाले— “लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्याशी संजय मंडलिक यांनी कधीही तुलना करून घेऊ नये. स्वर्गीय मंडलिकसाहेब कुठे आणि आजचे संजय मंडलिक कुठे!”
या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली असून दोन्ही गटांमध्ये वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“तोंड उघडले तर बात दूर दूर तक जाईल…!” – मंत्री हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना तीव्र इशारा
|