बातम्या

“शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर शेतकऱ्यांना विषाचे टॅंकर द्या—राजू शेट्टींचा देवाभाऊंवर स्फोटक हल्ला”

If you want Shakti Peeth Highway

By nisha patil - 11/28/2025 4:30:17 PM
Share This News:

“शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर शेतकऱ्यांना विषाचे टॅंकर द्या—राजू शेट्टींचा देवाभाऊंवर स्फोटक हल्ला”

लातूरच्या रेणापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा उग्र विरोध उफाळला. मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनासमोर शेतकरी आडवे पडले, इतकेच नाही तर विष प्राशनाचा प्रयत्न करत सरकारला ठणकावून इशारा दिला.
 
या पाश्र्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देवाभाऊंवर तुफान निशाणा साधत म्हटलं— “महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्ग करायचाच असेल, तर शेतकऱ्यांना आधी टॅंकरने विषपुरवठा करा, तेव्हाच तुमची महत्वाकांक्षा पुरी होईल!” शेट्टींच्या या विधानाने राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.

“शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर शेतकऱ्यांना विषाचे टॅंकर द्या—राजू शेट्टींचा देवाभाऊंवर स्फोटक हल्ला”
Total Views: 20