राजकीय
निवडणूक रिंगणात उतरायचं असेल तर शौचालयाचे हे शपथपत्र हवेच...
By nisha patil - 12/27/2025 4:36:29 PM
Share This News:
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात यंदा केवळ प्रचाराचा नाही, तर कागदपत्रांचा कस लागला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशाने इच्छुक उमेदवारांची पावले वेगाने हालू लागली असून, उमेदवारी अर्जासोबत स्वच्छतागृहाचे शपथपत्र अनिवार्य झाल्याने अनेकांची धावपळ सुरू झाली आहे.
घरात स्वतःचे शौचालय असो वा सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर—याबाबतची स्पष्ट कबुली आता कागदोपत्री द्यावी लागत आहे.
२०१६ मध्ये कायद्यात समाविष्ट झालेली ही अट, यंदा प्रथमच कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काटेकोरपणे अंमलात येत असल्याने इच्छुकांची चिंता वाढली आहे.
उमेदवारी अर्जातील प्रत्येक कॉलममध्ये ‘होय’ किंवा ‘नाही’ अशी ठाम नोंद बंधनकारक करण्यात आली असून, चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास केवळ अर्जच नव्हे तर भविष्यातील सदस्यत्वही धोक्यात येऊ शकते.
अर्ज भरण्यासाठी मोजकेच दिवस उरले असताना, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची एकच लगबग शहरात पाहायला मिळत आहे
निवडणूक रिंगणात उतरायचं असेल तर शौचालयाचे हे शपथपत्र हवेच...
|