बातम्या
कोगेतील जैन मंदिराजवळ अवैध उत्खनन उघडकीस; पुरातत्त्व विभागाचा तहसीलदारांना तातडीचा आदेश
By nisha patil - 6/12/2025 12:47:15 PM
Share This News:
कोल्हापूर :- करवीर तालुक्यातील कोगे येथील प्राचीन जैन मंदिर परिसरात अवैध उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना सोहम भांडे नावाच्या व्यक्तीकडून मंदिराजवळ तांत्रिक पद्धतीने खोदकाम सुरू असल्याची माहिती मिळताच राज्य पुरातत्त्व विभागाने तातडीने हस्तक्षेप केला.
विभागाचे सहायक संचालक यांनी करवीर तहसीलदारांना उत्खनन त्वरित थांबवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या स्थळाजवळ अशा बेकायदेशीर उत्खननामुळे प्राचीन मूर्ती, स्थापत्य अवशेष किंवा सांस्कृतिक वारशाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा अधिकार्यांनी दिला आहे. संबंधित व्यक्तीकडे कोणतीही मान्यता नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पुढील काळात असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून स्थानिक प्रशासनाला कठोर दक्षता उपाय अवलंबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोगेतील जैन मंदिराजवळ अवैध उत्खनन उघडकीस; पुरातत्त्व विभागाचा तहसीलदारांना तातडीचा आदेश
|