बातम्या
मोजे उंडी येथे अवैध शिकारीचा प्रयत्न उधळला : तिघांना अटक
By nisha patil - 9/15/2025 10:49:47 AM
Share This News:
पन्हाळा:-(शहाबाज मुजावर): वनपरिक्षेत्रातील मोजे उंडी जंगलात शिकारीच्या उद्देशाने फिरत असलेल्या तिघा संशयितांना वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून एक बॅरेटा बंदूक, मोटारसायकल व मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून अंदाजे १.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रविवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. गस्त घालत असलेल्या वनरक्षकांना जंगलात गोळीबाराचा आवाज आल्याने संशय आला. त्यानंतर युगराज दादू पाटील, अजीत दिलीप पाटील आणि सुरेश विक्रम पाटील हे तिघेजण बंदुकीसह जंगलातून जाताना आढळले. चौकशीत ते गारगोटी भागातील रहिवासी असल्याचे समोर आले.
पकडलेल्या आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली असून तपास सुरु आहे.
या कारवाईत उपवनसंरक्षक कोल्हापूर श्री. धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक श्री. कमलेश पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी श्री. अजीत बिळ्डी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
मोजे उंडी येथे अवैध शिकारीचा प्रयत्न उधळला : तिघांना अटक
|