बातम्या

इचलकरंजीत कुडचे मळा परिसरातील बेकायदेशीर दारूअड्डा उद्ध्वस्त...

Illegal liquor store in Kudche Mala area of ​​Ichalkaranjit


By nisha patil - 11/10/2025 2:51:43 PM
Share This News:



इचलकरंजीत कुडचे मळा परिसरातील बेकायदेशीर दारूअड्डा उद्ध्वस्त...

गैरकृत्याविरोधात  आमदार राहुल आवाडे यांचे ठोस पाऊल..

इचलकरंजी शहरातील कुडचे मळा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूअड्ड्याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेत आमदार राहुल आवारे यांनी  स्वतः घटनास्थळी धडक देत हा अड्डा उद्ध्वस्त केला. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या बेकायदेशीर कारभारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. शेवटी आमदार राहुल आवारे यांनी प्रशासनाला धारेवर धरत स्वतः पुढाकार घेऊन वेळीच कारवाई करत अड्डा बंद पाडला असून, या ठोस पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि समाजातील गैरप्रवृत्तीविरुद्ध उचललेले हे पाऊल स्थानिक प्रशासनाची तत्परता दाखवणारे ठरले आहे. यामुळे परिसरात शांतता प्रस्थापित झाली असून, आमदार आवाडे यांचे आभार मानले आहेत.


इचलकरंजीत कुडचे मळा परिसरातील बेकायदेशीर दारूअड्डा उद्ध्वस्त...
Total Views: 52