बातम्या
कोल्हापूर : महिलांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेणारा अवैध वेश्या व्यवसाय उध्वस्त, दोन पीडित महिलांची सुटका
By nisha patil - 8/10/2025 4:20:57 PM
Share This News:
कोल्हापूर : महिलांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेणारा अवैध वेश्या व्यवसाय उध्वस्त, दोन पीडित महिलांची सुटका
कोल्हापूर – पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलिसांनी महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायावर धडक कारवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने दसरा चौक ते ताराराणी पुतळा रोडवरील व्हिनस हॉटेल व लॉजिंग येथे छापा टाकला. या छापामध्ये हॉटेल मालक जयसिंग मधूकर खोत (रा. कुंभारवाडी, ता. शाहुवाडी) यास ताब्यात घेण्यात आले.
कारवाईत उत्तर प्रदेश व रायगड येथील एकूण २ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम ₹५०, मोबाईल हँडसेट आणि निरोध पाकीटे जप्त केले.
पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, गरजू महिलांना संपर्कात आणून त्यांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंध प्रोत्साहित करत प्रत्येक ग्राहकाकडून ₹३,०००/- वसूल केले जात होते, यापैकी अर्धी रक्कम महिलांना आणि अर्धी स्वतःस मिळत होती.
पीडित महिलांनीही कबूल केले की आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना दबावाखाली ही व्यवसाय करावा लागत होता.
सदर छापा कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे, हिंदुराव चरापले आणि इतर पोलीस अंमलदारांच्या टीमद्वारे यशस्वीपणे पार पाडली गेली.
कोल्हापूर : महिलांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेणारा अवैध वेश्या व्यवसाय उध्वस्त, दोन पीडित महिलांची सुटका
|