बातम्या
कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा भंडाफोड; केंद्रावर पोलिसांचा संयुक्त छापा, डॉक्टर फरार
By nisha patil - 11/24/2025 5:23:18 PM
Share This News:
कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा भंडाफोड; केंद्रावर पोलिसांचा संयुक्त छापा, डॉक्टर फरार
कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासोबत संयुक्त छापा टाकत या गैरकृत्याचा पर्दाफाश केला.
छाप्यात गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे अत्याधुनिक मशीन, संबंधित औषधे आणि गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस आणि आरोग्य विभागाकडून पंचनामा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अवैध रॅकेटशी संबंधित मुख्य संशयित डॉक्टर सध्या फरार आहे. तसेच या प्रकरणातील एजंटची नावेही पोलिसांच्या तपासात समोर आली आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.
कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा भंडाफोड; केंद्रावर पोलिसांचा संयुक्त छापा, डॉक्टर फरार
|