बातम्या
नेरली तामगाव ते उजळाईवाडी रस्ता तात्काळ सुरू करा.
By nisha patil - 9/6/2025 3:34:21 PM
Share This News:
नेरली तामगाव ते उजळाईवाडी रस्ता तात्काळ सुरू करा.
तामगाव ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
मध्य रस्त्यातच खोदलेल्या चरी मुळे होत आहेत अपघात
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी नेरली तामगाव ते उजळाईवाडी हा रस्ता प्रशासनाकडून बंद करण्यात आलाय. भर रस्त्यात भली मोठी चर खोदण्यात आली आहे. रस्ता बंद असल्यामुळे तामगाव व उजळाईवाडी इथल्या नागरिकांची मोठी गैरसोय झालीये.
त्यांना कोल्हापूरला जाण्यासाठी गोकुळ शिरगावला वळसा घालून जावे लागत आहे. हा मार्ग लांबचा असल्याने नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे. याचबरोबर रुग्णांचे ही हाल होत आहे. रस्त्यातच चर खोदल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.त्यामुळे नेरली तामगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पर्यायी रस्ता होईपर्यंत हा रस्ता तात्काळ सुरू करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
नेरली तामगाव ते उजळाईवाडी रस्ता तात्काळ सुरू करा.
|