बातम्या
मानाच्या गणपतीचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात
By nisha patil - 6/9/2025 12:30:45 PM
Share This News:
मानाच्या गणपतीचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात...
कडक बंदोबस्तात विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ
कोल्हापूर-: आज कोल्हापूरात गणेशोत्सव मिरवणुकीची सांगता होत असून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण आहे. मिरवणुकीच्या दिवशी होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा विशेष ताफा, स्पेशल फौजफाटा तैनात करून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
मिरवणुकीची सुरुवात पहिल्या मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पूजा खासदार शाहू महाराज व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत गणेशोत्सवाची सांगता भक्तीभाव, शिस्त आणि उत्साहात होत आहे.
मानाच्या गणपतीचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात
|