बातम्या

"गोकुळच्या वाशी युनिटमध्ये गैरव्यवस्थापनाचे पडसाद..

Impact of mismanagement in Gokul s Vashi unit


By nisha patil - 4/21/2025 3:42:28 PM
Share This News:



"गोकुळच्या वाशी युनिटमध्ये गैरव्यवस्थापनाचे पडसाद..

"शौमिका महाडिक यांची लेखी खुलाशाची मागणी

गोकुळ दूध संघाच्या वाशी (मुंबई) युनिटमध्ये झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे मोठ्या प्रमाणात दुधाचे नुकसान झाले असून, त्याचा थेट आर्थिक फटका गोकुळला बसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर संचालिका शौमिका महाडिक यांनी गंभीर दखल घेत कार्यकारी संचालकांकडे याबाबत लेखी खुलासा मागितला आहे. 

महाडिक यांनी आपल्या पत्रात अनेक प्रश्न केले असून

उशिरा वितरणामुळे एकूण किती लिटर दूध परत आले?

गेले तीन दिवसात नेमकी किती विक्री झाली?

नुकसान भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे

याशिवाय ३१ मार्च रोजी गोकुळच्या जुन्या पॅकिंग कंत्राटदाराची मुदत संपल्यानंतर, नवीन निविदा मागवण्यात आल्या होत्या. सर्वात कमी दर देणाऱ्या दिल्लीच्या एका नव्या कंपनीला कंत्राट देण्यात आले, परंतु ही कंपनी जुन्या साखळीच्या मदतीशिवाय कार्यरत राहू शकली नाही. परिणामी मुंबईतील वितरण व्यवस्था कोलमडली, आणि त्याचा थेट परिणाम दूध विक्रीवर झाला असल्याचा देखील त्यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केला आहे.


"गोकुळच्या वाशी युनिटमध्ये गैरव्यवस्थापनाचे पडसाद..
Total Views: 120