बातम्या
महत्वाची बातमी — कोल्हापूर महानगरपालिका मतदार यादी संदर्भात सूचना
By nisha patil - 11/23/2025 5:51:06 PM
Share This News:
महत्वाची बातमी — कोल्हापूर महानगरपालिका मतदार यादी संदर्भात सूचना
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 ची प्रारूप मतदार यादी अधिकृतरीत्या प्रसिद्ध झाली आहे. संबंधित नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही, हे तात्काळ तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादीत नाव नसल्यास, चुकीचे असल्यास किंवा काही हरकत असल्यास नागरिकांनी आपले पूर्ण नाव दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे. आपली माहिती तपासून आपल्या नावाची स्थिती आपणास कळविण्यात येईल.
टीप : मतदार यादीतील दुरुस्ती किंवा हरकतींसाठी अंतिम मुदत – 27 नोव्हेंबर
नागरिकांनी वेळ न दवडता तपासणी पूर्ण करून मताधिकार सुरक्षित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे
महत्वाची बातमी — कोल्हापूर महानगरपालिका मतदार यादी संदर्भात सूचना
|