बातम्या

इचलकरंजी विकासासाठी महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न

Important meeting for Ichalkaranji


By nisha patil - 10/27/2025 2:39:15 PM
Share This News:



इचलकरंजी विकासासाठी महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न

डॉ. राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने विविध  मुद्द्यांवर निर्णयप्रक्रिया गतीमान

इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने व मागणीनुसार घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भूषविले, तर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत खालील प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा झाली —
 पंचगंगा नदीतील वाळू व गाळ उपसा विषयक कार्यवाही गतीमान करणे
इचलकरंजीतील सर्व शासकीय कार्यालये एका केंद्रीय इमारतीत एकत्र आणणे
शहरातील इतर विकासविषयक प्रश्नांवर समन्वयात्मक निर्णय घेणे

या बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, उपविभागीय अधिकारी (इचलकरंजी), सह. आयुक्त (न.पा. प्रशासन, कोल्हापूर), कार्यकारी अभियंता, तहसिलदार व अपर तहसिलदार महसूल विभाग, तसेच नाना पाटील आणि संतोष कोळी यांसारखे मान्यवर उपस्थित होते.


इचलकरंजी विकासासाठी महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न
Total Views: 42