राजकीय

अलमट्टी धरण नियमनावर दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक...

Important meeting in Delhi


By nisha patil - 5/8/2025 2:31:25 PM
Share This News:



अलमट्टी धरण नियमनावर दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक...

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

 दिल्लीतील जलशक्ती मंत्रालयात केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलमट्टी धरणाच्या नियमनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस खासदार छ. श्रीमंत शाहू महाराज, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री, तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा धोका संभवतो, हे ठामपणे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले.तसेच, ही समस्या केवळ कोल्हापुराची नव्हे, तर सांगली जिल्ह्याचीही असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे या विषयावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

या शिष्टमंडळात राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार सतेज पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार राहुल आवाडे, आमदार अरुण लाड, आमदार अशोक माने आदींचा सहभाग होता.

केंद्रीय जलशक्ती विभागाच्या सचिव देवश्री बॅनर्जी, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष अतुल जैन, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आदी वरिष्ठ अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते.


अलमट्टी धरण नियमनावर दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक...
Total Views: 140